आयपीएलचा तेरावा हंगाही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. 29 मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा हंगाम बीसीसीआयने सर्वप्रथम १५ एप्रिलर्पंत पुढे ढकलला. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने बीसीसीआयने या हंगामाचे आयोजन स्थगित केले आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
त्यामुळे स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएल खेळवता येईल का, याची चाचपणी बीसीसीआय करत आहे. श्रीलंकेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असला तरीही या देशातील परिस्थिती फारशी गंभीर नाही. न्यूझीलंडमध्येही कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोकत आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र येत्या काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आल्यास दक्षिण आफ्रिकेत आयपीएल आयोजनाबद्दल विचार केला जाऊ शकतो.