नवी दिल्ली - चीनने भारताच्या बाजूने असलेल्या लाईन ऑफ कंट्रोलजवळ हजारो सैनिक, रणगाडे, तोफा आणि युद्धसामग्री सज्ज ठेवली आहे. यामुळे दोन्ही देशांतील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. यावेळी भारतानेही चीनला जशास तसे उत्तर देण्याची तयारी केलेली आहे. भारतीय सैन्यासोबतच भारतीच नौदलही आपल्या बाजूने तयारीत आहे.
एकीकडे सीमेवर भारतीय लष्कर आणि हवाई दलाने आपली तयारी पूर्ण केलीय. तर दुसरीकडे भारतीय नौदलानेही आपली जहाजं आणि पाणबुड्या तैनात करून अप्रत्यक्षरित्या आपण युद्धासाठी सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश चीनला दिला आहे. अर्थात अद्याप काहीही ठोस निर्णय झालेल नसला तरी भारताने आपल्या बाजूने युद्धाची तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.
पूर्व लडाखच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंदी महासागरात सर्व आघाडीच्या युद्धनौका आणि पाणबुड्या आक्रमकपणे तैनात करण्यात आलेल्या आहेत. भारतीय नौदलाने बीजिंगला एक स्पष्ट संदेश दिला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनला भारत-चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. तेव्हापासून सीमेवरील तणाव वाढलेला आहे.