ही रक्कम दिल्ली येथील एनजीओ उदय फाउंडशेनला मदत म्हणून दिली जाणार आहे. या पैशांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे रूग्ण, प्रवासी, कामगार आणि झोपड्यांमध्ये राहणार्या् लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. कर्णधार राणी रामपाल हिने सांगितले की, आम्हाला चांगली प्रतिक्रिया मिळाली. लोकांनी विशेषकरून भारतीय हॉकी प्रेमींनी जगभरातून या आव्हानात सहभाग घेतला आणि आपले योगदान दिले.
भारतीय महिला हॉकी संघाने जमवले २० लाख रुपये
Friday, July 17, 2020
नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाने कोरोनाविरुद्धच्या महामारीच्या लढाईत मदतीसाठी २० लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. भारतीय संघाने १८ दिवसांमध्ये फिटनेस चॅलेंजद्वारे ही रक्कम जमवली आहे. ३ मे रोजी फिटनेस चॅलेंज संपले. या आव्हानाद्वारे एकूण २० लाख रुपये जमा केले आहेत.
Tags