या पोस्टमधील दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही डॉ. संजय सोनवणे यांच्याशी संवाद साधला. डॉ. सोनवणे यांनी या वायरल झालेल्या दाव्याला नाकारले आहे. ते म्हणाले की सतत मास्क घालण्याने फुफ्फुसांमध्ये संसर्ग होण्याचा धोका नसतो, पण आपला मास्क पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा असायला पाहिजे.
नाकातील ओलावा, तोंडाची लाळ आणि घामामुळे मास्क ओला होतो, त्यानंतर त्यावर बुरशी किंवा फंगलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. अश्या परिस्थितीत जर आपण ओला मास्क घातल्यावर फंगस किंवा बुरशी आपल्या श्वासासह फुफ्फुसात गेले तर त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. म्हणून वापरले जाणारे मास्क दररोज चांगल्या प्रकारे साबण आणि गरम पाण्याने धुऊन घ्यावे आणि उन्हात वाळवावे. मास्क पूर्णपणे सुकल्यावरच त्याचा पुन्हा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.