ब्युरो रिपोर्ट - सध्याच्या जीवनशैलीमुळे वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि आहारामध्ये पौष्टिक घटकांचा अभाव, यामुळे सध्या बहुतांश जण केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त झालेले आहेत. लहान वयातच केस पांढरे होणे, निर्जीव होणे, केस तुटणे यावर कितीही महागड्या स्वरुपातील उपचार केले तरीही केस गळतीची समस्या काही केल्या दूर होत नाहीत, अशा तक्रारी केल्या जात आहेत.
केस गळतीसाठी एरवी केले जाणाऱ्या उपायांमुळे केसगळती कमी होणे दूरच, पण उलट केसांच्या समस्या अधिक वाढतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार निरोगी व्यक्तीच्या डोक्यावर सुमारे १ लाख केस असतात, त्यापैकी दररोज ५० ते १०० केस गळणे सामान्य मानले जाते. पण मोठ्या प्रमाणात केस गळणे, नवीन केस न येणे आणि टक्कल पडणे या गंभीर समस्या झालेल्या आहेत. यावर वेळीच उपाय होणे आवश्यक आहे.
केसगळती, कोंडा, कोरडे केस, केस तुटणे इत्यादी समस्यांवर उपाय शोधत आहात का? चिंता करू नका. यावर घरगुती रामबाण उपाय उपलब्ध आहे. हा उपाय केल्यास केसांशी संबंधित समस्या निश्चित कमी होतील, असा दावाही केला जातो. पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाचे केस वेगवेगळे असतात. त्यामुळे ही औषधे, घरगुती उपाय देखील कितपत प्रभावी ठरतात, यावर शंका आहे.