हे नवीन सोशल मीडिया ऐप सध्या आठ भाषांमध्ये उपलब्ध असून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या ऐपना टक्कर देणारे ठरण्याची शक्यता आहे. यात ऑडियो-व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅटिंग, सोशल कनेक्टिव्हिटी, न्यूज अपडेट्स, पे या फीचरद्वारे सुरक्षित ई-पेमेंट पर्याय आणि भारतीय ब्रँड्ससाठी ई-कॉमर्स यांसारखे फीचर्स उपलब्ध करुन दिलेले आहेत.
आता 'इलेमेंट्स' देशाचे अधिकृत सोशल मीडिया एप
Friday, July 17, 2020
नवी दिल्ली - देशातील पहिले अधिकृत सोशल मीडिया एप इलेमेंट्स लाँच झाले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी इलेमेंट्स हे नवीन सोशल मीडिया ऐप लाँच केले आहे. देशातील जवळपास १ हजार पेक्षा अधिक आयटी तज्ज्ञांनी हे स्वदेशी एप डेव्हलप केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व तज्ज्ञ श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे स्वयंसेवक आहेत, अशी माहिती नायडू यांनी दिली आहे.
Tags