एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनसुार ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी जवळपास सोडेनऊ कोटी लोकांनी पाहिला आहे. हॉटस्टारवर सिनेमा पाहण्यासाठी अनेकदा प्रिमिअम घ्यावा लागतो. त्यासाठी पैसेही मोजावे लागतात. काही सिनेमे मात्र मोफत पाहण्याची सोय उपलब्ध आहे.
सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्वांना पाहता यावा, यासाठी डिझनी प्लस हॉटस्टारने तो प्रीमिअम सबस्क्रीप्शन नसलेल्या प्रेक्षकांसाठी देखील मोफत ठेवलेला आहे. प्रदर्शनाच्या काही तासांनंतर लगेचच ‘दिल बेचारा’ हा सिनेमा एका टोरंट वेबसाइट्सवर देखील लीक झालेला आहे. त्यामुळे सुशांतचे चाहते मिळेत त्या माध्यमातून हा सिनेमा पाहत आहेत.