फडणवीस म्हणतात, सरकारमधील वादविवाद टोकाला

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न करत नाही. कारण हे सरकार पाडण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने फक्त करोनाच्या संकटाशी लढतोय, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.


फडणवीस म्हणाले, “आतापर्यंत न पक्षांच सरकार कधीच चाललेले नाही. मग देशाच्या इतिहासात महाराष्ट्राचे सरकार कसा अपवाद ठरेल ? खरंतर महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेलेले आहेत, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. ठाकरे सरकारला त्यांनी 'लिव्ह इन रिलेशनशिप'ची उपमा दिली. या आघाडीतील आपसातील अंर्तविरोधामुळेच सरकार पडेल” असेही फडणवीस म्हणाले.

इतकेच नाही, तर ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार पडेल, त्या दिवशी मजबूत सरकार देण्याची जबाबदारी आमची असणार आहे. आपण तसं सरकार देऊ, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राचे सरकार पाडायला आम्हाला कोणतेही मिशन हाती घेण्याची गरज नाही, हे सरकार आपोआप पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !