मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा(सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले. यात सर्वाधिक १२ रुग्ण गवळी वाडा येथे आढळले.
याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या संगमनेर येथील ०२ आणि नगर मनपा आणि राहाता येथील प्रत्येकी एका रुग्णाची आयसीएमआर पोर्टलवर नोंद आहे. जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश आहे. दिवसभरात ४९ रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: २२२
बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४५५
मृत्यू: १८
एकूण नोंद रुग्ण संख्या: ६९५
(नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर, यांनी दिलेली माहिती)