अबब ! एकाच दिवसात १६७ कोरोना पॉझिटिव्ह

• गुरुवारी ४६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये गुरुवारी दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३२२ इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ इतकी झाली आहे. 


गुरुवारी ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ७७३ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी ३२ जणांचे अहवाल  बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील ११, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १६ आणि श्रीगोंदा तालुक्यातील ५ जणांचे अहवाल बाधित आढळून आले. दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १७ जणांचे अहवाल बाधित आढळून आले. 

यामध्ये पाथर्डी तालुक्यातील १० (पाथर्डी शहर ०८, कोल्हूबाई कोल्हार ०२), भिंगार येथील ०२, नगर तालुक्यातील ०१ (घोसपुरी) आणि राहुरी तालुक्यातील ०४ (राहुरी फॅक्टरी ०३, म्हैसगाव ०१) जणांचे अहवाल बाधित आढळून आले. सायंकाळी ६५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले यामध्ये पारनेर ०४ (सिध्देश्वर वाडी ०३, खडक वाडी ०१) पाथर्डी ३२ (आगासखांड ०२, कोल्हुबाई कोल्हार ०९,  तिसगाव ०३,  त्रिभुवनवाडी  ०४, खाटीक गल्ली पाथर्डी 14),  कोपरगाव ०८ (सूरेगाव), 
 नेवासा ०१ (शिरसगाव),  नगर ग्रामीण १३ (नागापूर ०२, पोखर्डी ०८, देऊळगाव ०१, सांड सांडवा ०२), नगर शहर ०२,  जामखेड ०३ (दिघोळ ०२, लहाने वाडी ०१) आणि श्रीगोंदा ०१ (घोगरगाव), संगमनेर खुर्द ०१, चा समावेश आहे.

उपचार सुरू असलेले रुग्ण - ५१६
बरे झालेले रुग्ण - ७७३
मृत्यू - ३३
एकूण रुग्ण संख्या - १३२२
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !