मुंबई - राज्यात आज कोरोनाच्या ६ हजार ३३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७७ हजार २६० रुग्णांवर (ॲक्टिव्ह ) उपचार सुरू आहेत.
आज ८०१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.