सध्या देशात १० लाख २ हजार ७०७ रूग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. आतापर्यंत २५ हजार ५९५ रूग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. या कोरोनाबाधित एकूण रूग्णांपैकी ६ लाख ३५ हजार २४५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३ लाख ४१ हजारांहून अधिक संसंर्गग्रस्त रूग्ण भारतात आहेत.
देशात २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३२ हजार ६९५ कोरोनाबाधित रुग्णांचा वाढ झाली असून ६०६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत २४ हजार ९१५ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.