कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात करोना संसर्गाचे प्रमाण फार कमी होते. परंतु, जुलै महिन्यात मात्र कोरोनाने कहर सुरू केला. त्यानंतर तर रोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळत आहेत. गेल्या १० दिवसांत तब्बल २ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी दिवसभरात २२९ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता ५८२९ झाला आहे.
यात चिंतेची बाब म्हणजे आता काेरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. कोरोना बाधीत रुग्णांना ठेवण्यासाठी आता शहरातील मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने ही अंमलबजावणीही सुरू केली आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठातील वसतीगृहात देखील कोरोना बाधितांवर उपचार केले जाणार आहेत.
(image source : Gettyimages)