याबाबत कंपनीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे औषध २०० मिलीग्रामच्या टॅब्लेटच्या रूपात असणार आहे. त्याची जास्तीत जास्त विक्री किंमत ५९ रुपये असणार आहे. बाजारात कोणत्याही परिस्थितीत ती ५९ रुपयांपेक्षा जास्त विकली जाणार नाहीत. तसेच जागतिक क्लिनिकल पुराव्यांवरून कोरोना विषाणूच्या सौम्य ते मध्यम कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी फॅव्हीपिरावीर एक प्रभावी उपचार पर्याय असल्याचे म्हटले जात आहे.
काय सांगता ? कोरोनावर फक्त ५९ रुपयांत औषध
Saturday, July 25, 2020
नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचे स्वस्त आणि प्रभावी औषध डीजीसीआयने (ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) बाजारात आणण्यास मान्यता दिली आहे. या औषधाची किंमत फक्त ५९ रुपये असणार आहे. ब्रिंटन फार्मास्युटिकल्सने हे औषध तयार केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, डीजीसीआयने कडून त्याला अँटीवायरल ड्रग फॅव्हीपिरावीरच्या फॅव्हीटन या ब्रँड नावावर मार्केटिंग करण्याची परवानगी मिळाली आहे.
Tags