• खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद
अहमदनगर - जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४७ नवे रुग्ण आढळुन आले. तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. दिवसभरात एकूण १०६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात ४७ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये नेवासा ०८, भिंगार ०४, नगर ग्रामीण ०६, श्रीगोंदा ०९, राहुरी ०४, शेवगाव ०१, कर्जत ०१, संगमनेर ०५, नगर शहर ०७, श्रीरामपूर ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आला आहे
नेवासा ०८ (सोनई ०७, सलाबतपुर ०१), भिंगार ०४, नगर ग्रामीण ०६ (सारोळा कासार ०१, बुऱ्हाणनगर ०४, टाकळी खतगाव ०१), श्रीगोंदा ०९ (लोणी व्यंकनाथ ०२, चांडगाव ०१, कोळगाव ०१, घारगाव ०३, आजनुज ०१, देवदैठण ०१), राहुरी ०४ ( राहुरी बुद्रुक ०१, देवळाली प्रवरा ०३), शेवगाव ०१ ( वडगाव), कर्जत ०१ (गणेशवाडी),संगमनेर ०५ (राजापूर ०१, मालदाड रोड ०२, गणेशनगर ०१, कुरण ०१) श्रीरामपूर ०१. नगर शहर ०५.
उपचार सुरू असलेले रुग्ण - ६१४
बरे झालेले रुग्ण: १०२५
मृत्यू - ३८
एकूण रुग्ण संख्या -१६७७