तर यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यपाल धनगड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अशा वागण्यामुळे आपण व्यथित झालो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यघटनेतील नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे ते म्हणाले. हे राज्य पोलिसच चालवतात की काय, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राज्यघटनेतील तरतुदीनुसार आपले राज्य सरकारला नेहमी सहकार्य करण्याची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी झालेल्या गोष्टी सोडून आता चर्चेसाठी समोर आले पाहिजे. या दोन्ही बाजू एकत्र आल्या तर राज्याचा विकास करणे व घटनात्मक तरतुदींनुसार राज्य चालवणे शक्य आहे, असा सल्लाही राज्यपाल धनगड यांनी दिला आहे.