एकाच महिन्यात २६ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई - राज्यातील  52 हजार 442 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जून ते 25 जून पर्यंत राज्यातील 1 कोटी 32 लाख 96 हजार 23 शिधापत्रिका धारकांना 53 लाख 81 हजार 80 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 25 लाख 72 हजार 873 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.


राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 442 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 18 लाख 16 हजार 693 क्विंटल गहू, 13 लाख 90 हजार 61 क्विंटल तांदूळ, तर 19 हजार 241 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. 

त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 29 हजार 422 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !