पाकिस्तानातील बड्या नेत्यांनाही कोरोना संसर्ग

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील अनेक मोठ्या नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापूर्वी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद अहमद यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते.

पाकमध्ये आतापर्यंत १.६० लाखाहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत संसर्गामुळे तीन हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. परंतु कोरोनाने पाकिस्तानच्या संसदेत प्रवेश केला

आणि सत्ताधारी पक्षापासून विरोधी पक्षांतील दिग्गज नेते, मंत्र्यांना शिकार करण्यास सुरुवात केली. गेल्या काही आठवड्यांतच येथे १०० हून जास्त खासदार-आमदार बाधित झाले.

कोरोनाने बाधितांमध्ये हायप्रोफाइल नेत्यांमध्ये दोन माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी, शाहिद खाकन अब्बासीदेखील आहेत. रेल्वेमंत्री शेख रशीद, सभापती असद कैसर, संसदेतील विरोधी नेते व नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ, गृहराज्यमंत्री शहरयार खान आफ्रिदी यांनाही संसर्ग झाला.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !