नवी दिल्ली - आधीच कोरोनाने आर्थिक कणा मोडला असताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला
चांगलीच झळ बसली आहे. आज नव्याने पुन्हा डिझले 17 तर पेट्रोल 21 पैशांनी
महाग झालं आहे. 20 दिवसामध्ये डिझेलच्या किंमतीत तब्बल 10 रुपयांनी तर
पेट्रोल ९ रुपयांनी महागलं आहे.
नव्या दरानुसार दिल्लीत पेट्रोल 80.13 रुपये प्रति लिटर तर डिझेल-
80.19 रुपये लिटर झाले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल- 86.91 रुपये प्रति लिटर तर
डिझेल- 78.51 रुपये लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल- 81.82 रुपये प्रति लिटर
तर डिझेल- 75.34 रुपये लिटर झाले आहे.
नवीन दरांसाठी आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.