मुंबईत बाप्पांचे आगमन होणार, पण उंचीची अट

सायली लवटे । मुंबई -  उंच गणेशमूर्ती आणि ही मुंबई ही गणेशोत्सवाची ओळख आहे. पण यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशउत्सव साधेपणानं व सुरक्षितरित्या पार पाडावा म्हणून गणेशमूर्तींच्या मूर्तींबाबतचा मुद्दा पुढे आला होता. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, असा सर्वांनी एकमतानं निर्णय घेतला आहे.


मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. यंदा मात्र ते टाळावे लागणार आहे. मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील, असेे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !