नवी दिल्ली - भारत चीनच्या सीमा वादाचे परिणाम आता दोन्ही देशातील इतर घटकांवरही जाणवू लागले आहेत. भारताच्या सीमा शुल्क विभागाने चीनमधून येणाऱ्या सामानाच्या खेपांचे भौतिक निरीक्षण सुरु केले आहे. गोपनीय विभागामार्फत हे काम केले जाते आहे.
चीनमधून आयात होणाऱ्या सामानाची तपासणी अधिक कडक प्रमाणात केली जात आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या इशाऱ्यानंतर भारताच्या सीमा शुल्क विभागाने ही मोहीम अधिक कडक केली आहे. विशेषतः चीनमधून येणारा जो माल देशांतर्गत विमानांनी जात आहे, अशा मालाची कसून तपासणी केली जात आहे.
गेल्या आठवड्यात लदाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चीन व भारतीय सैन्यात हिंसक चकमक झाली होती. यात भारतीय सैन्यातील एका कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. तेव्हापासून भारत चीन संबंध पुन्हा तणावग्रस्त झाले आहेत.